विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवार, 4 डिसेंबर रोजी ढाका येथील शेरे बांगला स्टेडियमवर होणार आहे. बांगलादेशमध्ये या मालिकेसाठी टीम इंडिया (Team India) चांगलाच घाम गाळत आहे. या मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडू दीर्घ विश्रांतीनंतर परतले आहे. मालिकेत सर्वांच्या नजरा स्टार फलंदाज विराट कोहलीवर (Virat Kohli) असतील. विराटला 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये फलंदाजी करायला आवडते. या फॉरमॅटमुळे तो एक महान खेळाडू बनला आहे. विराट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे सगळ्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याचा बांगलादेशातील रेकॉर्ड देखील मजबूत आहे. बांगलादेशविरुद्ध त्यांच्या घरी, विराट सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

कसे आहेत विराटचे आकडे 

विराट कोहलीने आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर एकूण 8 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये विराटने 90.66 च्या सरासरीने 544 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकेही केली आहेत. आशिया चषकादरम्यान आपल्या जुन्या रंगात परतल्यानंतर विराटने मागे वळून पाहिलेच नाही. अशा स्थितीत तो बांगलादेशविरुद्ध जोरदार धावाचा पाऊस पाडू शकतो. 2022 च्या विश्वचषकात विराटने सर्वाधिक धावा केल्या होत्या. सध्याच्या संघात विराट कोहलीशिवाय शिखर धवनने 4 सामन्यात 186 धावा केल्या आहेत आणि रोहित शर्माने बांगलादेशात 6 सामन्यात 143 धावा केल्या आहेत. तसेच या दोन्ही फलंदाजांनी एकही शतक झळकावलेले नाही. (हे देखील वाचा: IND vs BAN सामन्याआधी Rohit Sharma आणि Liton Das यांनी एकदिवसीय मालिका ट्रॉफीचे केले अनावरण, पहा फोटो)

कसोटीमध्येही दाखवु शकतो दमदार प्रदर्शन

भारताला 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. मालिकेतील दुसरा सामनाही याच स्टेडियमवर ७ डिसेंबरला होणार आहे. आणि तिसरा वनडे 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे खेळवला जाईल. या मालिकेनंतर टीम इंडिया 14 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. विराटही कसोटी संघाचा एक भाग आहे आणि या पाच सामन्यांमध्ये त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर धावा होण्याची चाहत्यांची अपेक्षा आहे.