Team India Series Schedule Year 2024: भारतीय क्रिकेट संघाने (India Cricket Team) 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. यावर्षी भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, (WTC 2023) आशिया कप, (Asia Cup 2023) एकदिवसीय विश्वचषक (ICC World Cup 2023) अशा अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवली. तथापि, टीम इंडिया (Team India) अद्याप दक्षिण आफ्रिकेत आहे आणि 7 जानेवारी 2024 पर्यंत दुसरा कसोटी सामना खेळून संघ भारतात परतेल. यानंतर, संघ 11 जानेवारीपासून नवीन वर्षासाठी आपली नवीन मोहीम सुरू करेल. टीम इंडियाची या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सहा संघांसोबत निश्चित लढत होणार आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma In 2023: कर्णधार रोहित शर्मासाठी 'हे' वर्ष ठरले चढ-उतारांनी, आकडेवारीत केली चमकदार कामगिरी तर आयसीसीसी ट्राॅफीमध्ये मिळाली निराशा)
टीम इंडियाचा सामना 6 संघांशी!
मात्र, अद्यापही ऑगस्ट महिना रिकामा आहे. यात नंतर कोणतीही नवीन मालिका जोडली जाऊ शकते. सध्या तरी याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. पण त्याआधी स्पष्ट चित्राबद्दल बोलायचे झाले तर भारताला सहा संघांचा सामना करावा लागणार आहे. या कालावधीत टीम इंडिया 16 कसोटी, 3 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार आहे. हे टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वर्ष आहे, त्यामुळे जून 2024 पासून ही मेगा इव्हेंट देखील आयोजित केली जाणार आहे. आता 2024 मध्ये होणाऱ्या टीम इंडियाच्या मालिकेबद्दल जाणून घेऊया:-
Team India's schedule in the FTP from 2024-2027:
61 - T20is.
42 - ODIs.
38 - Tests.
- 141 matches in total. pic.twitter.com/S17NT1Azs8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 30, 2023
भारतीय संघाचे 2024 च्या मालिकेचे वेळापत्रक
1. 11 ते 17 जानेवारी - अफगाणिस्तान विरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने (घरच्या मैदानावर)
2. 25 जानेवारी ते 11 मार्च – इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका (घरच्या मैदानावर)
3. जुलै – श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20, 3 एकदिवसीय सामने (तपशीलवार वेळापत्रक प्रलंबित)
4. सप्टेंबर – बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी, तीन टी-20 (तपशीलवार वेळापत्रक प्रलंबित)
5. ऑक्टोबर- 3 न्यूझीलंड विरुद्ध कसोटी (तपशीलवार वेळापत्रक प्रलंबित)
6. नोव्हेंबर-डिसेंबर – ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी (तपशीलवार वेळापत्रक प्रलंबित)
आयपीएल 2024 चे आयोजन मार्चच्या अखेरीपासून
सध्या, संपूर्ण वेळापत्रक आणि तारखा केवळ अफगाणिस्तान आणि इंग्लंड मालिकेसाठी बीसीसीआयने ठरवल्या आहेत. तर अधिकृत घोषणा आणि उर्वरित चार मालिकांचे तपशीलवार वेळापत्रक आणि तारखा अद्याप प्रतीक्षेत आहेत. आयपीएल 2024 चे आयोजन मार्चच्या अखेरीपासून मे अखेरपर्यंत केले जाईल. त्यानंतर जूनमध्ये यूएसए आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 विश्वचषक 2024 होणार आहे. ऑगस्टची विंडो अद्याप रिकामी आहे, त्या काळात टीम इंडियाचे वेळापत्रक काय असेल हे पाहणे बाकी आहे.