Photo Credit - Sri lanka Cricket X Account

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 2nd Test 2024 Day 2 Scorecard:   श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबरपासून गॉल (Galle)  येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर पथुम निसांका स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि दिनेश चंडिमल यांनी मिळून डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांमध्ये शतकी भागीदारी झाली. या खेळीसह, त्याने 13 डावांमध्ये पाच कसोटी शतके झळकावणारा सर्वात वेगवान आशियाई क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला आहे.  (हेही वाचा - Most Wickets in Asia in Tests: आशियामध्ये सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन पोहोचला टॉप-2 वर, 'हा' गोलंदाज नंबर-1 वर)

या पराक्रमासह, कमिंडू मेंडिसने महान डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली, ज्यांनी 13 डावांमध्ये पाच कसोटी शतके झळकावण्याचा विक्रमही केला होता. 13व्या कसोटी सामन्यातील त्याची ही कामगिरी आहे, यावरून त्याचे सातत्य आणि क्षमता दिसून येते. मॅडिसने 147 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यात 12 चौकार आणि एक षटकार होता. त्याच्या या खेळीने संघालाही मजबूत स्थितीत आणले.

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याचे स्कोअरकार्ड

याआधी दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल 116, अँजेलो मॅथ्यूज 88, धनंजय डी सिल्वा 44 धावा करून बाद झाले. तर कामिंदू मेंडिस 156 आणि कुसल मेंडिस (86) खेळत आहेत. चहापानाच्या ब्रेकपर्यंत श्रीलंकेने 5 विकेट गमावून 565-5 (149) धावा केल्या आहेत. दरम्यान, न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिपने 3 आणि टीम साऊथीने 1 विकेट घेतली आहे.