IND vs BAN 2nd Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs BAN 2nd Test 2024) भारताचा स्टार खेळाडू आर अश्विनने (Ravichandra Ashwin) इतिहास रचला आहे. कानपूर (Kanpur) येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोची विकेट घेत आर अश्विन आशियातील सर्वाधिक बळी (Most Wickets in Asia in Tests) घेणारा गोलंदाज बनला आहे. रविचंद्रन अश्विनने आशिया खंडात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेत इतिहास रचला आहे. बांगलादेशविरुद्ध एक विकेट घेऊन त्याने टीम इंडियाचा दिग्गज माजी कर्णधार अनिल कुंबळेचा 419 बळींचा विक्रम मागे टाकला आहे. (हे देखील वाचा: R Ashwin Breaks Anil Kumble's Record: कानपूर कसोटीत आर अश्विनने रचला इतिहास, यावेळी कुंबळेचा 'हा' मोठा विक्रम मोडला)
श्रीलंकेचा मुरलीधरन आहे पाहिल्या क्रमांकावर
आर अश्विनने आशिया खंडात आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 420 विकेट घेतल्या आहेत. तर टीम इंडियाचा दिग्गज माजी कर्णधार अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत आशियामध्ये 419 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर आशियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनने आशिया खंडात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 512 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
Most wickets in Asia in Tests 👇
612 - Muttiah Muralitharan (21.69 avg)
420* - R Ashwin (21.37 avg)
419 - Anil Kumble (27.00 avg)
354 - Rangana Herath (26.03 avg)
300 - Harbhajan Singh (32.01 avg) pic.twitter.com/Ib3nOPLlIS
— CricTracker (@Cricketracker) September 27, 2024
आशियातील सर्वाधिक कसोटी बळी (Most Wickets in Asia in Tests)
612 एम मुरलीधरन
420 आर अश्विन*
419 अनिल कुंबळे
354 रंगना हेरथ
300 हरभजन सिंग