Photo Credit - ESPN CricInfo

Australia National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team Match Scorecard:  श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ, 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  दुसरा आणि शेवटचा सामना 06 फेब्रुवारी (बुधवार) ते 09 फेब्रुवारी (रविवार) दरम्यान गॅले (Galle)  येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर  (Galle International Stadium) खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 9 विकेट्सने पराभव केला आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 75 धावांचे सोपे लक्ष्य गाठून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी फक्त 75 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी सहज साध्य केले. उस्मान ख्वाजा 27 धावा काढून नाबाद परतला आणि मार्नस लाबुशेन 26 धावा काढून नाबाद परतला. श्रीलंकेकडून एकमेव विकेट प्रभात जयसूर्याने घेतली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 विकेट्सने जिंकला आणि मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने एक अनोखा इतिहास रचला आहे.  (हेही वाचा  -  Australia ODI squad For Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर, खेळाडूंची संपूर्ण यादी येथे पहा)

स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये 200 झेल घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक ठरला

स्टीव्ह स्मिथचा कसोटी क्रिकेटमधील 200 वा झेल येथे पहा:

स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो 200 झेल घेणारा पहिला ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक ठरला. श्रीलंकेविरुद्ध गॅले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याने ही मोठी कामगिरी केली. त्याने नाथन लायनच्या गोलंदाजीवर कुसल मेंडिसला झेल देऊन हा विक्रम केला. हा टप्पा गाठणारा स्टीव्ह स्मिथ जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त राहुल द्रविड (210 झेल), महेला जयवर्धने (205), जॅक कॅलिस (200) आणि रॉस टेलर (200) आहेत. या विक्रमासह स्मिथने आणखी एक कामगिरी आपल्या नावावर केली.

या ऐतिहासिक कसोटीत स्मिथचे कर्णधारपदही उत्कृष्ट होते. त्याने ऑस्ट्रेलियाला 9 विकेटने विजय मिळवून दिला आणि मालिका 2-0 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 414 धावा केल्या, ज्यामध्ये अ‍ॅलेक्स केरी (156) आणि स्टीव्ह स्मिथ (131) यांच्या शतकांचा समावेश होता. श्रीलंकेने पहिल्या डावात 257 आणि दुसऱ्या डावात 231 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 75 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाने सहज साध्य केले.