![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/11/Australia-17-784x441.jpg?width=380&height=214)
Australia National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 2 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 12 फेब्रुवारी (बुधवार) पासून कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली (Australia ODI squad )आहे. या संघातून मार्कस स्टोइनिस, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल मार्श यांना वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे मिचेल मार्श केवळ या मालिकेतूनच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर असल्याने त्याच्या जागी जेक फ्रेझर-मॅकगर्कचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, शॉन अॅबॉट, बेन द्वारशुइस, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा हे शेवटच्या तीन क्रमांकावर खेळतील. नियमित कर्णधार पॅट कमिन्स अनुपस्थित राहणार असल्याने स्टीव्ह स्मिथ सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तो एकदिवसीय संघाचे नेतृत्वही करू शकतो.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ:
Australia announces their ODI squad for the Sri Lanka series, but they have not yet announced the captain🙌#SteveSmith #TravisHead #MarnusLabuschange #AlexCarey #GlennMaxwell #JoshInglis #SLvAUS #SLvsAUS #Cricket #SBM pic.twitter.com/zeiCKhETRu
— SBM Cricket (@Sbettingmarkets) February 9, 2025
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस, अॅलेक्स केरी, आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, कूपर कॉनोली, शॉन अॅबॉट, बेन द्वारशीस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, मिचेल स्टार्क, नाथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, तन्वीर संघा