कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्वात भयंकर परिणाम चीननंतर इटली आणि इराण देशांमध्ये दिसून येत आहे. या व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक देशांतून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. यामुळे बरेच लोक एकाच देशात अडकून राहिले आहेत. काही भारतीयही येथे अडकले आहेत, त्यापैकी एक आयपीएल खेळणाऱ्या भारतीय खेळाडू आनंद राजन याचे वडीलही आहेत. कोरोनाने झगडत असलेल्या इराणमध्ये (Iran) मध्य प्रदेशातील या खेळाडूचे वडील अडकले आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आनंद राजन (Anand Rajan) म्हणाले की, भारत सरकारने बर्याच भारतीयांना इराणमधून परत आणले आहे आणि त्यांचे वडीलही परत येतील अशी त्यांना आशा आहे. इराणमधील कोरोना व्हायरसमुळे आजवर 1500 हून अधिक लोकांनी प्राण गमावले असून 20 हजार लोक संसर्गित झाले आहेत. (Coronavirus: इटली मध्ये 24 तासांत 800 जणांचा बळी; मृतांची संख्या 4 हजार 825 वर)
इराण जवळजवळ संपूर्णपणे जगापासून दूर गेला असल्याने त्याच्या वडिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. “माझ्या वडिलांनी मला सांगितले की दूतावासा अशाच लोकांना प्रवास मान्य करत आहेत ज्यांची वैद्यकीय तपासणी ते स्वतः करत आहेत. मला सांगण्यात आले की या समस्या सामोरे जाण्यासाठी दूतावासाकडे आवश्यक वैद्यकीय किट नाही, म्हणून वेळ संपत आहे. पुढच्या एका आठवड्यासाठी कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी नसल्यामुळे काय होईल हे आम्हाला माहिती नाही, ”राजन म्हणाला.
No communication from your side yet . Awaiting . Please help 🙏🏻
— Anand Rajan (@iamANANDRAJAN) March 20, 2020
आनंद आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला आहे. राजन हा मध्यमगती गोलंदाज आहे जो मध्य प्रदेशसाठी 40 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मदतीसाठी त्यांनी इराणमधील भारतीय दूतावासाला ट्वीट केले असून त्यांच्या वडिलांशी संपर्क साधण्याचे आश्वासन दिले होते पण शनिवारपर्यंत काहीही झाले नाही, असे तो म्हणाला. भारत सरकारने इराण, जपान, मिलान आणि जगाच्या इतर भागांमधून भारतीयांना बाहेर काढले आणि परतीच्या प्रवासात त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहेत.