
Children's Day 2019: पंडित जवाहरलाल नेहरू (Pt Jawaharlal Nehru) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुलं अगदी प्रिय होते. मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं प्रेम पाहता त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो आणि मुलं त्यांना 'चाचा नेहरू' म्हणायचे. बालदिन 2019 च्या निमित्ताने आम्ही येथे काही भारतीय क्रिकेटपटूंचे क्वचित बालपण फोटो पाहूया जे कदाचितच तुम्ही पहिले असतील. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि महेंद्र सिंह धोनी यांचे काही दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. या फोटोंद्वारे तुम्हाला तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंच्या बालपणीची एक झलक पाहायला मिळेल. (Children’s Day 2019: बालदिन साजरा करताना जाणून घ्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचे प्रेरणादायी विचार)
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ते भारताचे प्रदीर्घकाळ सेवा करणारे पंतप्रधान आहेत. नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 या काळात पंतप्रधान राहिले होते. त्याचे मुलांशी अगदी जवळचे नाते होते आणि म्हणूनच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश बालदिन साजरा करतो. आता, भारतीय क्रिकेटपटूंच्या बालपणीच्या या फोटोंवर नजर टाकूया.
विराट कोहली
सचिन तेंडुलकर
रोहित शर्मा
एमएस धोनी
जसप्रीत बुमराह
हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या
राहुल द्रविड
रवींद्र जडेजा
बालदिनानिमित्त शैक्षणिक संस्थांमध्ये बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. मृत्यू होण्यापूर्वी पं. जवाहरलाल नेहरू, भारताने 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला होता. संयुक्त राष्ट्र संघात ही तारीख सार्वत्रिक बालदिन म्हणून पाळली जाते. 1964 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांची जयंतीनिमित्त भारतात बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला.