
Children’s Day 2019: संपूर्ण भारतभर 14 नोव्हेंबर हा बालदिन (Children’s Day) म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू ( Jawaharlal Nehru) यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरु यांना लहान मुंले प्रचंड आवडत असत. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलेही त्यांना चाचा नेहरु ( Chacha Nehru) म्हणून संबोधत असत. त्यामुळे त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिन निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बालकांचे आरोग्य, शिक्षण आदींबाबत जागृती करण्यासाठीही बालदिनाचे औचित्य साधले जाते. बालदिनाचे औचित्य साधत पंडित जवाहरलाल नेहरु यांचे हे काही प्रेरणादायी विचार.
पंडित जवाहरलाल नेहरु प्रेरणादायी विचार.

नागरिकता ही देशसेवेतच असते - पं. जवाहरलाल नेहरू

संकट आणि विरोध यामुळे आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो. हासुद्धा एक लाभच आहे - पं. जवाहरलाल नेहरू
(हेही वाचा, महात्मा गांधी यांचे आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणारे '5 प्रेरणादायी विचार')

लोकशाही ही जगातील सर्व शासन प्रणालीत सर्वोच्च प्रणाली आहे. - पं. जवाहरलाल नेहरू

भांडवलशाहीला सामाजाने जर नियंत्रीत ठेवले नाही तर ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत तर गरीबांना अधिकच गरीब बनवतात. -पं. जवाहर लालनेहरू

शांतता नसेल तर सर्व स्वप्नं संपून जातात. त्यांना काहीच अर्थ उरत नाही - पं. जवाहरलाल नेहरू

चर्चा अधिक आणि काम कमी हीच आमच्या कर्तव्यपालनातील कमी आहे - पं. जवाहरलाल नेहरू

प्रामाणिक लोक हे कुशल आणि महान कार्य करत असतात. अनेकदा त्यांना लगेच ओळख मिळत नाही. परंतू, संघर्षाच्या शेवटी यश त्यांचेच असते - पं. जवाहरलाल नेहरू

जीवन हा विकासाचा सिद्धांत आहे. स्थिर राहण्याचा नाही - पं. जवाहरलाल नेहरू

जो व्यक्ती परिस्थितीपासून दूर पळतो तो स्थिर व्यक्तिपेक्षा अधिक संकटात सापडतो - पं. जवाहरलाल नेहरू

जी पुस्तके आम्हाला विचार करण्यासठी प्रवृत्त करतात ती सर्वात अधिक सहकारी असतात -पं. जवाहरलाल नेहरू
14 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो बालदिन?
20 नोव्हेंबर 1954 मध्ये बालदिन साजरा करण्याची घोषणा यूएनने केली होती. भारतातही हा दिवस 20 नोव्हेंबरलाच साजारा केला जात असे. दरम्यान, 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नेहरुंचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा जाऊ लागला. पंडीत नेहरु यांना असलेली लहान मुलांची आवड म्हणून देशभरात बालदिन साजरा केला जाऊ लागला.