
Mahatma Gandhi 150th Jayanti: भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पानही आहे. या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या विचारांतून जगाला प्रेरणा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर ला150 वी जयंती आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.
स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा अहिंसावादी मार्गाने आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यांच्या भाषणातून, लेखणीतून त्यांचे विचार नेहमीच लोकांपर्यंत पोहोचले. आजच्या पिढीला तसेच पुढील प्रेरणादायी ठरतील असे 5 प्रेरणादायी विचार



हेही वाचा- महात्मा गांधी 150 व्या जयंती निमित्त मध्य रेल्वे ची अनोखी मानवंदना; इंजिनावर झळकणार खास चित्र


आजच्या पिढीला जरी हे विचार भले हे विचार तितकेसे पटत नसतील, पण ह्याच विचारांवर गांधीजींनी तसेच त्यांच्या समर्थकांनी कित्येक आंदोलने यशस्वीरित्या आणि शांततेच्या मार्गाने केली. 'न भूतो न भविष्यति' असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्व आहे होते आणि सदैव आपल्या स्मरणात राहणार.