Mahatma Gandhi 150th Birth Anniversary: महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त यंदा देशभरात मोठा सोहळा पार पडणार आहे, यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) कडूनही जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. यासाठी मुंबई- पुणे (Mumbai- Pune) आणि मुंबई-कोकण (Mumbai-Konkan) अशा मार्गावर धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या गाड्यांवर तिरंगा आणि महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून या उपक्रमाचे काम सुरु आहे,याअंतर्गत लोकोमोटिव्ह म्हणजेच डिझेलच्या इंजिनावर गांधींचे चित्र काढण्यात येत असून आता हे काम शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 15 लोकोमोटिव्ह इंजिन्स रंगवण्याचे काम पूर्ण झाले आहे तर आणखीन 7 इंजिनांवर अशाच प्रकारे गांधींचे चित्र रंगवण्यात येईल. ही सर्व कामे नियमित वेळेतच लोको शेड मध्ये पार पडत आहेत. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींच्या जयंती प्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एक रंगवलेले लोकोमोटिव सजविण्यात येणार असून ते गाडीसह चालविण्यात येणार असल्याची माहितीही सध्या समोर येत आहे.
पहा ट्विट
Well, @Central_Railway makes Gandhi locos to celebrate #150YearsofGandhi pic.twitter.com/IMzC5Rb3iX
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) September 24, 2019
दरम्यान, यंदा महात्मा गांधी यांची जयंती खास असणार आहे. यासाठी मागील महिन्याच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाचं घोषणा देखील केल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर 'स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतिम टप्प्यात 11 सप्टेंबरपासून 'स्वच्छता ही सेवा' (Swachhata Hi Sewa) हे अभियान पंधरवड्याच्या स्वरूपात सुरू झाले आहे. तसेच यादिवशी गांधींच्या आश्रमाला, स्मृतिस्थळाला भेट द्या , गांधींच्या स्वप्नातला भारत साकरण्यासाठी श्रमदान करा असे आवाहनही मोदींनी केले आहे.