Mann Ki Baat, 25 August Highlights: महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त 'स्वच्छता ही सेवा' पंधरवडा सुरू होणार; पहा आजच्या 'मन की बात' कार्यक्रमातील महत्त्वाच्या गोष्टी
File Image of Narendra Modi addressing nation via Mann Ki Baat | (Photo Credits: PTI)

Mann Ki Baat Key Highlights: सलग दुसर्‍यांदा भाराताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तिसरा 'मन की बात' (Mann Ki Baat)  कार्यक्रम जाहीर केला. सध्या परदेश दौर्‍यांवर असलेल्या नरेंद्र मोदींचा हा 'मन की बात' कार्यक्रमामध्ये यंदा कृष्ण जन्माष्टमी, महात्मा गांधी यांची 150 वी जयंती ते य Man vs Wild या कार्यक्रमामधील अनुभव या सार्‍यांवर भाष्य केले आहे. जगाला शांतीचं महत्त्व पटवून देणार्‍या महात्मा गांधी यांच्या 150 वी जयंती निमित्त भारतासोबत जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. 'स्वच्छ भारत मोहिमेच्या अंतिम टप्प्यात 11 सप्टेंबरपासून 'स्वच्छता ही सेवा' (Swachhata Hi Sewa) हे अभियान पंधरवड्याच्या स्वरूपात  सुरू होणार असल्याची माहिती मोदींनी दिली आहे.

आज नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारा भारतीयांशी संबोधताना एकाच वेळी मला 'कृष्ण आणि गांधीजी हे दोन्ही 'मोहन' समोर दिसत असल्याचं म्हटलं आहे. भारत यंदा 150 व्या गांधी जयंतीचा सोहळा 2 ऑक्टोबर दिवशी साजरा करणार आहेत. त्यामुळे यंदा गांधीजींच्या किमान एका आश्रमात, स्मृतिस्थळाला नक्की भेट द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. गांधींजीच्या स्वप्नातला भारत साकरण्यासाठी श्रमदान करा असे आवाहनही त्यांनी केले आहे. भारत केवळ घाणीच्या साम्राज्यातून मुक्त झाला नाही पाहिजे तर सोबतच प्लस्टिक मुक्त भारताची देखील या दिवसापासून सुरूवात करण्याठी खास योजना साकारल्या जाणार आहेत. मन की बात: चांद्रयान 2, मेघालय पाणी संवर्धन मोहिमेला नरेंद्र मोदी यांनी दिली कौतुकाची थाप, वाचा काय होता आजचा अजेंडा

मन की बात एपिसोड 

 

Man vs Wild कार्यक्रमातील अनुभवही खास होता असं मोदींनी सांगितलं आहे. जेथे जाऊ, लोकांना भेटू तेथे लोकं या अनुभवाबद्दल कुतहलाने विचारतात असं त्यांनी सांगितलं आहे. भारतीयांना त्यांनी नॉर्थ ईस्ट प्रदेशांनाही भेट देण्याचं, तेथील सौंदर्य न्याहाळण्याचं आवाहन केलं आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ यांची संख्यादेखील दुप्पटीने वाढली आहे. त्यांच्या संरक्षणासाठी काळजी घेणं, वन संरक्षण करणं ही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.