शेन वार्न यांच्या बॅगी ग्रीन कॅपचा 5 कोटीत लिलाव; ऑस्ट्रेलिया येथील जंगलांमध्ये लागलेल्या आगीतील पीडितांना करणार मदत
Shane warne (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत परिधान केलेली बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात शेट वार्न यांच्या बॅगी ग्रीन कॅपला 5 कोटीपर्यंत किंमत मिळाली आहे. या लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीतील पीडितांना मदत करणार असल्याचे शेन वार्न यांनी जाहीर केले होते. ऑस्ट्रेलियात गेल्या चार महिन्यांपासून भडकलेल्या आगीत आतापर्यंत 50 कोटी प्राण्यांना जीव गमवावा लागला असून जंगलही जळून खाक झाली आहेत.

शेन वॉर्नने आपल्या पोस्टमध्ये लिहीले होते की, "ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे आमचा आत्मविश्वास डगमगला आहे. या भयंकर आगीचा परिणाम इतक्या लोकांवर होत आहे, ज्याची कल्पना देखील करता येणार नाही. या आगीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. घरे जळून खाक झाली आहेत आणि 50 कोटींहून अधिक जनावरे या आगीत भस्मसात झाली आहेत. अशा या कठीण प्रसंगी प्रत्येकजण एकमेकांसोबत आहे. तसेच आम्ही दररोज पीडितांना मदत आणि सहयोग करण्याचे मार्ग शोधत आहोत. या कारणामुळेच मी माझी आवडती 'बॅगी ग्रीन कॅप (350) चा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर 12 जानेवारी ही लिलावाची अंतिम तारिख होती. त्यानुसार आज लिलावात या कॅपला 5 कोटी रुपयांपर्यंत किंमत मिळाली आहे. तसेच या पैश्यातून ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीतील पीडितांना मदत करण्यात येणार असल्याची घोषणा शेनवार्न यांनी केली आहे. हे देखील वाचा- सुनील गावस्कर यांनी सद्य परिस्थितीवर विद्यार्थ्यांना दिला सल्ला; पहा काय म्हणाले ते

शेन वार्न यांचे ट्वीट-

तसेच ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल आणि डार्सी शॉर्ट सारख्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी बिग बॅश लीगमध्ये त्यांच्या वतीने मारण्यात येणाऱ्या प्रत्येक षटकारावर 250 ऑस्ट्रेलियन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे. इतर खेळांमधील खेळाडू देखील मदतनिधी गोळा करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. टेनिसस्टार मारिया शारापोव्हा आणि नोवाक जोकोविच यांनी सुद्धा ऑस्ट्रेलिया बुशफायर रिलीफ फंडसाठी स्वतःकडून 25-25 हजार डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.