स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: AP/PTI)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यात चौथा टेस्ट क्रिकेट सामना मॅनचेस्टर (Manchester) येथे सुरु आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाचा तडाखेबाज खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steven Smith) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International Cricket) स्पर्धेत त्याच्या करिअरचे २६वे शतक ठोकले आहे. या सामन्यात स्मिथ 2 वेळा जीवनदान मिळाले आहे. याचा फायदा घेत त्याने या सामन्यात दमदार शतक झळकवले आहे. स्टीव्ह स्मिथ याला पहिल्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) बॉल लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. परंतु चौथ्या कसोटी सामन्यात त्याला संधी देण्यात आली. या संधीचे सोने करत या सामन्यात स्मिथने त्यांच्या करिअरचे २६वे शतक ठोकले आहे. महत्वाचे म्हणजे, या मालिकेत स्मिथने तिसरे शतक ठोकले आहे.

स्टीव्ह स्मिथ याला बॉलसोबत छेडछाड केल्याप्रकरणी एका वर्षाचा प्रतिबंध लावण्यात आले होते. परंतु एक वर्षानंतर परतलेल्या स्टीव्ह स्थिमने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही इनिंगमध्ये १४४ आणि १४२ अशी उत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे ऑस्टेलियाच्या संघाला पहिल्या सामन्यात २५१ धावांनी विजय मिळवता आला होता. सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर आस्ट्रेलिया संघ १७० धावांवर ३ बाद या परस्थितीत होता. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला स्टीव्ह स्मिथ ६० धावांवर होता. या दरम्यान, सामन्यात जोफ्रा आर्चरच्या पहिल्या षटकात स्टीव्ह स्मिथला जीवनदान मिळाले होते. हे देखील वाचा-Ind vs Pak, U19 Asia Cup 2019: अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक आमनेसामने, 7 सप्टेंबरला होणार महामुकाबला

स्टुअर्ट ब्रॉडने सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ट्रेविस हेडला बाद करुन पहिली विकेटे मिळवली होती. त्यांनतर पाऊसामुळे हा खेळ थांबवण्यात आला होता. खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ ८२ धावांवर असताना रनआऊट होण्यापासून बचावला. इंग्लंड संघाचे स्पिनर जॅक लीचने मॅथ्यू वेडला बाद करुन संघाला ५ वा विकेट मिळवून दिला. त्यानंतर संयमी खेळी करत स्टीव्ह स्मिथने त्याच्या करिअरचे २६वे शतक ठोकले आहे.