सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला अंडर-19 वर्ल्ड कप (Under 19 Asia Cup) ला आजपासून सुरुवात होणार आहे. यात पहिले दोन सामने भारत विरुद्ध कुवेत यांच्यात तर दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. हे सामने श्रीलंकेच्या स्टेडियममध्ये रंगणार आहेत. या सामन्यांमध्ये सर्वात महत्वपुर्ण सामना ठरणार आहे तो भारत विरुद्ध पाक (Ind Vs Pak). या सामन्यासाठी लोकांमध्ये बरीच उत्सुकता असून येत्या 7 सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे.
सामना कोणत्याही खेळाचा असो पण भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. त्यामुळे येत्या 7 सप्टेंबरला होणा-या या सामन्यात लोकांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात अंडर-19 संघाचे कर्णधारपद युवा ध्रुव जुरेल याच्याकडे देण्यात आले आहे.
यंदाच्या आशियाई चषकमध्ये एकूण 8 संघ सामिल झाले आहे. यात श्रीलंका, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, कुवेत, बांग्लादेश, नेपाळ आणि युएई या संघांचा समावेश आहे. यात दोन्ही संघांना अ आणि ब अशा दोन गटात विभागणी केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे.
भारताच्या गटात पाकिस्तान शिवाय अफगाणिस्तान आणि कुवेत या दोन संघाचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि युएई या संघाचा समावेश आहे. अंडर-19 युथ आशियाई चषकाची अंतिम सामना 14 सप्टेंबरला कोलंबोच्या आर. प्रेमदासा (R. Premadasa Stadium)मैदानावर रंगणार आहे.