The Wall राहुल द्रविड यांच्या जागी भारत 'अ' संघ आणि अंडर -19 क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी 'या' माजी खेळाडूंची निवड
Rahul Dravid ( फाईल फोटो)

भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) याची नुकतीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (National Cricket Acadamy) प्रमुखपदी निवड झाली आहे. यामुळे भारत 'अ' संघ (India A) आणि अंडर-19 संघाची (Under19 Team) फलंदाज प्रशिक्षकपदी कोणाची निवड करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. नुकतीच पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत'अ' संघाचे प्रशिक्षक म्हणून सितांशू कोटक (Sitanshu Kotak) यांची निवड करण्यात आली आहे, तर अंडर-19 भारतीय संघाचे प्रशिक्षकपद पारस म्हाम्ब्रे (Paras Mhambrey) यांच्याकडे सोपण्यात आले आहे.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी नाव केले आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावली आहे. या उत्तम खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ (prithvi shaw), शुबमन गिल (Shubhman Gill) आणि श्रेयस अय्यर (shreyas iyer)यांसारख्या खेळाडूचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. द्रविड आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे.

सध्या भारत अ संघ आणि अंडर-19 संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपदी कोटक आणि म्हाम्ब्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोटक यांनी १३० प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४१.७६ च्या सरासरीने हजार ६१ धावा केल्या आहेत. म्हाम्ब्रे यांनी दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार (Ramesh Powar) यांची निवड करण्यात आली आहे. हे देखील वाचा-पंतप्रधान मोदींच्या Fit India Moment समर्थनार्थ सचिन तेंडुलकर याने शेअर केला 'हा' खास व्हिडिओ

माहितीनुसार कोटक आणि म्हाम्ब्रे यांच्याकडे कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद काही महिन्यासाठीच असणार आहे. महत्वाचे म्हणजे, कोटक आणि म्हाम्ब्रे हे फलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी कशाप्रकारे संभाळतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.