भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचा आज क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांमध्ये समावेश केला जातो. जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीदरम्यान शॉट मारण्यात अडचणींचा सामना करावा लागतो, पण पाकिस्तानचा अष्टपैलू अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) याचा असा विश्वास आहे की तो बुमराहचा चेंडू आरामात खेळला असता. बुमराहची गोलंदाजी रज्जाकला खास वाटत नाही. रज्जाकने ज्या प्रकारचे विधान केले आहे ते दर्शवते की रझाक आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेट संघ स्वत: काहीही करण्यास सक्षम नाही, स्वदेश असो किंवा परदेशी भूमी, पाकिस्तानी संघाला सर्वत्र पराभवाचा सामना करावा लागत आहे. पण या सर्व गोष्टी विसरून पाकिस्तानचे माजी खेळाडू येथील-तेथील गोष्टींकडे अधिक लक्ष देत आहेत. आपल्या देशाचा संघ सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी रज्जाक दुसर्या संघाच्या गोलंदाजांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. (IND vs WI 2019: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात पुन्हा सुरु होणार रेस, वर्षाखेरीस कोण राहणार No 1 'हिटमॅन' की 'किंग कोहली'?)
रज्जाक म्हणाला, 'मी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना केला आहे. मला बुमराहचा चेंडू खेळण्यात काहीच हरकत नाही. मला गोलंदाजी करताना दबाव बुमराहवर असेल. जेव्हा जेव्हा आपण ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर सारख्या गोलंदाजांना सामोरे जाता तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास येतो आणि जेव्हा तुम्ही असे गोलंदाजांविरुद्ध खेळून येतात तेव्हा बुमराह माझ्यासाठी 'बेबी गोलंदाज' आहे. मी त्याचा आरामात सामना करेन, हे देखील मला ठाऊक आहे की मी माझ्या काळातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा सामना केला आहे."
इतकंच नाही तर रज्जाक भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बद्दलही म्हणाला की, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या बरोबरीने त्याला ठेवता येणार नाही. तो म्हणाला, "जर तुम्ही 1992 ते 2007 दरम्यान खेळलेल्या खेळाडूंशी बोललात तर ते त्या काळात कोणत्या पातळीवर क्रिकेट खेळले गेले ते सांगतील. त्यावेळी जगातील सर्वोत्तम खेळाडू खेळले. जगात या स्तराचे कोणतेही खेळाडू यापुढे होणार नाहीत. त्या स्तराची गोलंदाजीची पातळी नाही, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणही नाही." तो म्हणाला की विराट धावा बनवतो, तो भारतीय संघाचा खूप चांगला खेळाडू आहे. तो सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे परंतु आपण त्याला सचिनबरोबर ठेवू शकत नाही. सचिन एका वेगळ्याच स्तराचा फलंदाज होता.