दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध भारत (India) यांच्यातील पहिला कसोटी (1st Test Match) सामना विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील व्हिडीसीए ( VDCA) मैदानात पार पडला. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सर्वोकृष्ट कामगिरी करुन दाखवली आहे. दक्षिण अफ्रिकेला पहिल्या सामन्यात 203 धावांनी मात करुन भारताने तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या फलंदाजीने सर्वांचे मन जिंकली आहेत. या दरम्यान, एका पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या सामन्याची आठवण करुन दिली आहे. माझ्या कारकिर्दीमधील पहिला कसोटी सामना आत्तापर्यंतचा सर्वात विशेष होता, असे रोहित शर्मा म्हणाला आहे.
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात विशाखापट्टण येथे व्हीडीसीए मैदानावर 6 ऑक्टोबर रोजी पहिला कसोटी सामन्याची लढत पाहायला मिळाला आहे. भारता आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचा सलामवीर रोहित शर्मा याने पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावून उत्कृष्ट कामिगिरी करुन दाखवली आहे. परंतु, पत्रकार परिषदेत रोहित शर्माला या सामन्याबदल विचारल्यानंतर कारकर्दिला पहिला सामना अवस्मरणीय होता, असे त्याने सांगितले आहे. तसेच मी रेकॉर्डसाठी खेळत नाही. मला केवळ खेळण्याचा आनंद घेत असतो. परंतु, 2013 मध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना माझ्यासाठी आतापर्यंत सर्वात विशेष होता, असेही रोहित शर्मा म्हणाला आहे. हे देखील वाचा-IND vs SA 1st Test: 5 विकेट घेत मोहम्मद शमी ने रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांच्या 'या' Elite यादीत झाला समावेश
रोहित शर्मा यांचा व्हिडिओ-
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पुढील सामना 10 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. अगामी सामना जिंकून भारत मालिकेवर विजय मिळवण्याच्या हेतूने मैदनात उतरेल तर, दुसरीकडे मालिकेत बरोबरी करण्यासाठी दक्षिण अफ्रिका प्रयत्न करेल.