फेसबुकमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरु आहे. आता 6 हजार नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. मेटा कर्मचारी छाटणीची नवी फेरी सुरू करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे ग्लोबल अफेअर्सचे अध्यक्ष निक क्लेग यांनी कंपनीच्या बैठकीत कर्मचारी आणि इतर लोकांना याची माहिती दिली आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी अलीकडेच घोषणा केली की, टाळेबंदीची पुढील फेरी मे 2023 मध्ये सुरू होईल. आता, त्याच्या अधिकृत घोषणेपूर्वी, 6000 लोकांना काढण्यात येणार असल्याची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे.

कंपनीने नोव्हेंबरमध्ये 11,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि मार्च 2023 मध्ये 10,000 नोकऱ्या कपातीची घोषणा केली. त्यावेळी यातील 4,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते, याचा अर्थ आता यातील 6,000 लोकांना मे मध्ये कंपनी सोडण्यास सांगितले जाईल. (हेही वाचा: 55K Jobs Cut Due To AI: बीटी ग्रुपमध्ये होणार सर्वात मोठी कर्मचारी कपात; आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जाणार 55 हजार नोकऱ्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)