CEO’s Passport Stolen by Ex-employee: आजकाल जगभरात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात सुरु आह्रे. भारतामध्येही अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. नुकतेच देशातील सारथी एआय नावाच्या कंपनीतही अशीच नोकर कपात झाली, मात्र आपल्याला कामावरून काढल्याचा राग मनात ठेऊन कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने चक्क सीइओ विश्व नाथ झाचा यांचा पासपोर्ट चोराला. या पासपोर्टमध्ये यूएस व्हिसाही होता. नवा पासपोर्ट मिळवण्यात झा यांना यश आले आहे, मात्र नव्या अमेरिकन व्हिसाची प्रतीक्षा फार जड ठरत आहे. या घटनेमुळे झा यांना कंपनीसाठी नवीन निधी मिळवून देण्यासाठी परदेशात प्रवास करता आला नाही. अहवालानुसार, सारथी एआयने 2023 पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 140 वरून 40 पर्यंत कमी केली आहे.
झा यांनी कबूल केले की सारथी एआयने गेल्या 2 आर्थिक वर्षांपासून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने टीडीएस जमा केलेला नाही. झा म्हणाले, ‘आम्ही कंपनी चालवण्यासाठी आणि विद्यमान संघाचे वेतन देण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत आणि लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडू.’ (हेही वाचा: Cognizant Offering 2.5 LPA to Freshers: कॉग्निझंटने फ्रेशर्सना ऑफर केले वार्षिक 2.5 लाख रुपयांचे पॅकेज; नेटीझन्सनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली)
पहा पोस्ट-
Saarthi AI Layoffs: CEO Vishwa Nath Jha Claims Laid Off Employee Stole Passport With US Visa Making Impossible for Him To Travel Abroadhttps://t.co/uV00DFfWN0#SaarthiAILayoffs #Layoffs #TechLayoffs #ArtificialIntelligene #Bengaluru #Startup #SaarthiAI #VishwaNathJha
— LatestLY (@latestly) August 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)