Dunzo Layoffs: गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या ई-कॉमर्स डिलिव्हरी फर्म डन्झोमध्ये पुन्हा नोकर कपात झाली आहे. यावेळी कंपनीने आपल्या 75 ताक्कीये म्हणजेच जवळपास 150 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मिंटच्या अहवालानुसार, डन्झो आपला खर्च कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी कंपनी भांडवलाच्या शोधत आहे, तसेच वाढत्या दायित्वांची पुर्तता करण्यासाठी नफा परत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. कंपनीने आर्थिक वर्षे 2023 मध्ये 1,801 कोटींचा तोटा नोंदवला, जो त्या मागील आर्थिक वर्षातील 464 कोटींपेक्षा लक्षणीय जास्त आहे.
या आर्थिक ताणामुळे सध्याच्या आणि माजी कर्मचाऱ्यांच्या पगाराची देयके, तसेच विक्रेत्यांची थकबाकी भरण्यासही विलंब झाला आहे. कंपनीने आजपर्यंत जवळजवळ $470 मिलियन उभारले आहे. रिलायन्स रिटेलचा सर्वात मोठा भागधारक म्हणून यात 25.8% हिस्सा आहे. डंझोच्या आर्थिक अडचणींमुळे कायदेशीर आव्हानेही निर्माण झाली आहेत. जुलैमध्ये, कर्जदारांच्या एका गटाने कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. (हेही वाचा: Apple to Create Jobs in India: ॲपल भारतात निर्माण करणार 6 लाखांहून अधिक नोकऱ्या; 70 टक्क्यांहून अधिक असतील महिला कर्मचारी)
ऑनलाइन डिलिव्हरी फर्म डंझोमध्ये 75% कर्मचाऱ्यांची नोकरकपात-
Reliance Retail-backed #Dunzo has laid off 150 employees in a fresh round of layoffs, leaving the e-commerce delivery firm with just 50 employees in its core supply and marketplace teams.
(@sowmyaram_ reports)https://t.co/iO4ngz7sgi
— Mint (@livemint) August 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)