Indian Govt Blocked 18 OTT Platforms: केंद्र सरकारने देशातील 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली. मुरुगन म्हणाले की 2021 च्या आयटी नियमांनुसार या 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यात आली आहे. ते म्हणाले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध मध्यस्थांच्या समन्वयाने कारवाई केली आहे आणि अश्लील, अशोभनीय कंटेंट प्रकाशित करण्यासाठी 14 मार्च 2024 रोजी 18 ओटीटी प्लॅटफॉर्म अवरोधित केले आहेत.

शिवसेनेच्या उद्धव गटाचे सदस्य अनिल देसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुरुगन म्हणाले की, 2021 च्या आयटी नियमांनुसार या 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यात आली आहे. डिजिटल मीडियावरील बातम्या आणि चालू घडामोडींच्या प्रकाशकांसाठी आणि ऑनलाइन क्युरेटेड सामग्रीच्या (OTT प्लॅटफॉर्म) प्रकाशकांसाठी आचारसंहिता देखील नियमांमध्ये आहे. (हेही वाचा: OpenAI ने फोन आणि WhatsApp द्वारे अखंड प्रवेशासाठी 1-800-ChatGPT केले लाँच)

केंद्र सरकारने ब्लॉक केले 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्स-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)