Gautam Gambhir: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारतासाठी खूप खास ठरली. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir)याला एका चाहत्याने भगवान रामाची मूर्ती (Lord Ram) भेट दिली. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने दबदबा निर्माण केला होता. ही स्पर्धा अपराजितपणे जिंकली होती. गेल्या वर्षी टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडकडून मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गौतम गंभीरसाठी हे पहिले मोठे आयसीसी जेतेपद आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एका चाहत्याने गौतम गंभीरला भगवान रामाची मूर्ती भेट दिली. Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी देताना स्टेजवर पीसीबीचा एकही अधिकारी का नव्हता? आयसीसीने दिले स्पष्टीकरण

गौतम गंभीरला चाहत्याने भेट दिली प्रभू श्री रामांची मूर्ती

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)