Mumbai Train Update: पश्चिम रेल्वेने 8 आणि 9 मार्च 2025 रोजी वसई रोड (Vasai Road) आणि भाईंदर (Bhayandar) स्थानकांदरम्यान अत्यावश्यक ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक नियोजित (Western Railway Block) केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, अप फास्ट मार्ग रात्री 11.30 ते पहाटे 3 वाजेपर्यंत ब्लॉक राहील, तर डाउन फास्ट मार्ग पहाटे 1.15 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत राहील. या काळात, विरार आणि भाईंदर/बोरिवली दरम्यान सर्व जलद गाड्या धीम्या मार्गांवर धावतील. काही उपनगरीय गाड्या देखील रद्द केल्या जातील. प्रवाशांना स्थानकांवर तपशील तपासण्याचा आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

8 आणि 9 मार्च ला वसई रोड आणि भाईंदर दरम्यान अत्यावश्यक कामांसाठी ब्लॉक नियोजित

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)