Train Hijack In Pakistan | ( (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बलुच लिबरेशन आर्मी (Baloch Liberation Army) ने बलुचिस्तानमधील बोलानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले आणि १२० प्रवाशांना ओलिस ठेवल्याचे वृत्त आहे. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तान या देशात अलिकडील काळात घडलेली ही सर्वात मोठी दहशतवादी घटना मानली जात आहे. बीएलए (BLA) या दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि कोणत्याही लष्करी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात हत्या होतील असा इशारा दिला आहे. बीएलएने अधिकृत निवेदनात, बीएलएने जाहीर केले की त्यांच्या सैनिकांनी मश्काफ, धादर, बोलान येथे एक काळजीपूर्वक नियोजित कारवाई केली आहे.

बीएलए दहशतवाद्यांचा पाकिस्तान लष्करास इशारा

बीएलएने आपल्या निवदेनात म्हटले आहे की, 'आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी पाकिस्तान मध्ये असलेला रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे, ज्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबण्यास भाग पाडले आहे. लढाऊंनी जलद गतीने ट्रेनचा ताबा घेतला आणि सर्व प्रवाशांना ओलीस ठेवले, असे या गटाने म्हटले आहे. त्यांनी सहा लष्करी कर्मचाऱ्यांच्या हत्येची पुष्टी केली आणि इशारा दिला की त्यांच्याविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईमुळे सर्व ओलीसांना मृत्युदंड दिला जाईल. (हेही वाचा, Air India Flight Technical Issue: शिकागोहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड; उड्डाणानंतर 10 तासांनी विमान पुन्हा परतले, प्रवाशांसाठी केली पर्यायी व्यवस्था)

बीएलएच्या विशेष तुकड्या हल्ल्यात सहभागी

बीएलएने सांगितले की त्यांच्या माजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह पथकाने या कारवाईचे नेतृत्व केले. गटाचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी पुन्हा सांगितले: 'जाफर एक्सप्रेस ताब्यात घेतल्यानंतर बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याचा जमिनीवरील हल्ला पूर्णपणे परतवून लावला आहे. तीव्र संघर्षांनंतर, पाकिस्तानी भूदलांना माघार घेण्यास भाग पाडले गेले, परंतु हेलिकॉप्टर आणि ड्रोनमधून हवाई हल्ले सुरूच आहेत'.

पत्रकाराकडून घटनेबाबत एक्स पोस्ट

Bahot X Post

बीएलए आणि पाकिस्तानी सैन्यात चकमकी सुरू

प्रसारमाध्यमांनी वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याने अपहरण केलेल्या ट्रेनवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी जमिनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु बीएलएच्या अतिरेक्यांनी तीव्र प्रतिकार केल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. बलुचिस्तानच्या घडामोडींचे वृत्तांकन करणारे पत्रकार बाहोत बलुच यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) वर लिहिले:पाकिस्तानी जमीनी सैन्याने माघार घेतली, हवाई लढाई सुरूच आहे.

दरम्यान, बीएलएचा दावा आहे की 100 हून अधिक शत्रू सैनिक त्यांच्या ताब्यात आहेत, पुढे असे म्हटले आहे: कब्जा करणाऱ्या सैन्याला हवाई हल्ले थांबवण्याची आणि त्यांच्या माणसांना वाचवण्याची संधी आहे. अन्यथा, सर्व ओलिसांच्या फाशीची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानी सैन्यावर असेल. बलुचिस्तानमध्ये वाढता तणाव आणि पाकिस्तानातील या घटनेने पाकिस्तानच्या रेल्वे नेटवर्क आणि राष्ट्रीय स्थिरतेसाठी गंभीर सुरक्षा चिंता निर्माण केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढील कारवाईची अद्याप पुष्टी केलेली नाही.