टीम इंडियाने आजपासून आशिया चषकात आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची स्पर्धा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या हाय-व्होल्टेज सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या टीम इंडियाला 48.5 षटकांत 266 धावांत गुंडाळले गेले. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्याने सर्वाधिक 87 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 50 षटकात 267 धावा करायच्या आहेत. दरम्यान पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आणि पुर्ण मैदान पावसाने झाकण्यात आल आहे. यामुळे आता षटकांमध्ये कपात होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत डीएलएसनुसार पाकिस्तानला असे लक्ष्य मिळू शकते. 254 धावा 45 षटके 239 धावा 40 षटके 203 धावा 30 षटके 155 धावा 20 षटके

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)