इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकून दमदार कामगिरी केली. आता टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिका होणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाठवण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. मंगळवारी हा संघ चार्टर्ड विमानातून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला. अशात या खेळाडूंचा एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये भारतीय संघ फुल मूडमध्ये दिसत आहे. संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या हटके स्टाईलचा एक खास अंदाज प्रदर्शित करत आहे. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरील विजयाचा आनंद ओसंडून वाहत आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये राहुल द्रविडदेखील सामील आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)