शुक्रवारी, इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार फटकेबाजी करत इंडियन प्रीमियर लीगमधील पहिले शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या या शतकाचे करोडो चाहते वेडे झाले. तसेच सामन्या दिवशी मुंबई इंडियन्स माजी स्फोटक फलंदाज आताच फलंदांजी कोच कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांचा वाढदिवश होता त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये एकच जल्लोष करण्यात आला.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)