Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा दहावा सामना रविवारी 30 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) यांच्यात विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Delhi Capitals bowled out Sunrisers Hyderabad for 163 with terrific bowling spells! 🏏🌟
Mitchell Starc was the hero with a brilliant five-wicket haul! 🔥
An easy chase on the cards for DC, or will SRH fight back? 🤔#Cricket #DCvSRH #IPL2025 #Sportskeeda pic.twitter.com/mCNL8N4L4z
— Sportskeeda (@Sportskeeda) March 30, 2025
अनिकेत वर्माची 74 धावांची शानदार खेळी
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने 18.4 षटकात 10 गडी गमावून 163 धावा केल्या. हैदराबादकडून अनिकेत वर्माने 74 धावांची शानदार खेळी केली. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेनने 32 तर ट्रॅव्हिस हेडने 22 धावांचे योगदान दिले.
मिचेल स्टार्कने घेतल्या सर्वाधिक 5 विकेट्स
दुसरीकडे, मिचेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्कने व्यतिरिक्त कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या. तर मोहित शर्माला 1 विकेट मिळाली. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)