IND vs ZIM 2nd T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारतीय संघाचा 13 धावांनी लाजीरवाणा पराभव केला. भारतीय फलंदाज पुर्णपणे फ्लाॅप ठरले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय युवा संघ आज मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 234 धावा केल्या आहेत. भारताकडून युवा खेळाडू अभिषेक शर्माने शतक झळकावले. तर दुसरीकडे, झिम्बाब्वेसाठी ब्लेसिंग मुझाराबानी आणि वेलिंग्टन मसाकादझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी झिम्बाब्वे संघाला 20 षटकात 235 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वे संघाला सहावा मोठा धक्का बसला आहे. क्लाईव्ह मादेंडे 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. झिम्बाब्वे संघाची धावसंख्या 78/7 आहे.
2ND T20I. WICKET! 11.1: Wellington Masakadza 1(3) Run Out Dhruv Jurel, Zimbabwe 76/7 https://t.co/yO8XjNqmgW #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)