टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आशिया कप 2023 (Asia Cup 2023) सुपर-4 मध्ये पाकिस्तान (IND vs PAK) विरुद्ध खेळताना एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, रोहितने शाहीन शाह आफ्रिदीविरुद्धच्या डावाच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकला आणि यासह तो वनडेमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यात टीम इंडियाची आतापर्यंत चांगली सुरुवात झाली आहे. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आशिया चषक 2023 सुपर-4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना कोलंबोमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली.
Rohit Sharma becomes the first batter to hit a six against Shaheen in the first over in ODI. pic.twitter.com/9JaJQByvQ4
— Johns. (@CricCrazyJohns) September 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)