IND vs BAN 2nd Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या (IND vs BAN 2nd Test) कसोटी मालिकेतील शेवटचा आणि दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur Green Park) खेळवला जात आहे. खराब आऊटफिल्डमुळे दोन दिवस खेळ झाला नाही. त्यानंतर आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात चौथ्या दिवशी बांगलादेशचा संघ 233 धावांत गडगडला. बांगलादेशला पहिल्या डावात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) अखेरचा धक्का दिला. यासह जडेजाने इतिहास रचला आहे. आता अशी कामगिरी करणारा जडेजा आशियातील पहिला गोलंदाज ठरला आहे. रवींद्र जडेजाला पहिल्या डावात केवळ एक विकेट घेण्यात यश आले. ही एक विकेट घेऊन जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळीही पूर्ण केले आहेत. जडेजा आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 बळी आणि 3000 धावा करणारा आशियाई खेळाडू बनला आहे.
Last wicket of the innings and it's a special one for @imjadeja 😎
3⃣0⃣0⃣ wickets in Test Cricket 👏👏
Live - https://t.co/JBVX2gz6EN#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1hZhQcq7Vz
— BCCI (@BCCI) September 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)