India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: महिला टी-20 विश्वचषक 2024 ला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आज भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. (India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखायला मिळाली आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने या स्पर्धेत शानदार सुरुवात केली. तर टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती.
New Zealand win Match 4⃣ of the #T20WorldCup.#TeamIndia will aim to bounce back in the next game.
Scorecard ▶️ https://t.co/XXH8OT5MsK#INDvNZ | #WomenInBlue pic.twitter.com/DmzOpOq87g
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
स्पर्धेतील चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करत 67 धावा केल्या. न्यूझीलंड संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 160 धावा केल्या.
हे देखील वाचा: IND vs NZ Amelia Kerr Run Out Controversy: टीम इंडियासोबत झाली चीटिंग? फलंदाज बाद होऊनही पॅव्हेलियनमध्ये गेला नाही; वाचा नेमक काय घडल
सोफी डेव्हाईनची वादळी खेळी
न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डेव्हाईनने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. तिच्या या स्फोटक खेळीत सोफी डिव्हाईनने 36 चेंडूत सात चौकार मारले. सोफी डिव्हाईनशिवाय जॉर्जिया प्लिमरने 34 धावा केल्या. टीम इंडियाकडून रेणुका सिंह ठाकूरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. रेणुका सिंग ठाकूरशिवाय अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 161 धावा करायच्या होत्या.
भारताचे फलंदाज ठरले स्पशेल अपयशी
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर शेफाली वर्मा अवघ्या 11 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही. संपूर्ण भारतीय संघ 19 षटकांत 102 धावा करून ऑलआऊट झाला. टीम इंडियाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 15 धावा केल्या. हरमनप्रीत कौरशिवाय जेमिमाह रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 13 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून रोझमेरी मायरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रोझमेरी मायरशिवाय ली ताहुहूने तीन बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)