टीम इंडियाने आजपासून आशिया चषकात आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची स्पर्धा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होत आहे. या हायव्होल्टेज मॅचकडे भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या हाय-व्होल्टेज सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या टीम इंडियाला 48.5 षटकांत 266 धावांत गुंडाळले गेले. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्याने सर्वाधिक 87 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तान संघाला 50 षटकात 267 धावा करायच्या आहेत.
ASIA CUP 2023. WICKET! 48.5: Jasprit Bumrah 16(14) ct Agha Salman b Naseem Shah, India 266 all out https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)