आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील शनिवारी (2 सप्टेंबर) तिसरा सामना अनिर्णित राहिला. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया 50 ओव्हर्सही खेळू शकली नाही. 48.5 षटकांत सर्वबाद 266 धावा झाल्या. यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांनी दोन्ही कर्णधारांशी बोलून सामना रद्द झाल्याचे घोषित केले. अशा प्रकारे पाकिस्तानचे दोन सामन्यांतून तीन गुण झाले. त्यांनी पहिल्याच सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. दुसरीकडे, भारताच्या खात्यात एका सामन्यातून एक गुण आहे. आता सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात नेपाळला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. सुपर-4 मध्ये पोहोचणारा पाकिस्तान हा पहिला संघ आहे.
ASIA CUP 2023. India vs Pakistan - No Result https://t.co/B4XZw382cM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)