IND vs NZ 1st ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डॅरिल मिशेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 49.2 षटकात अवघ्या 337 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक 140 धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना 21 जानेवारीला रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
1ST ODI. India Won by 12 Run(s) https://t.co/IQq47h2W47 #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)