Army Day 2025: लष्कर दिनाचे औचित्य साधून एपिक युट्यूब चॅनेलवर 'द ग्रेनेडिअर्स : पिलर्स ऑफ पॉवर ऑफ द इंडियन आर्मी' हा विशेष माहितीपट दाखवला जाणार आहे. या माहितीपटात भारतीय लष्करातील प्रतिष्ठित पायदळ रेजिमेंट ग्रेनेडिअर्सच्या शौर्याचा अद्भुत इतिहास आणि कहाणी मांडण्यात आली आहे. १७७८ साली स्थापन झालेली ग्रेनेडिअर्स ही भारतीय लष्करातील सर्वात जुनी आणि आदरणीय रेजिमेंट आहे. ग्रेनेडिअर्स ची निवड जगभरातील रेजिमेंटमधील सर्वोत्तम आणि मजबूत सैनिकांमध्ये केली जाते. भारतीय लष्करातही या जवानांची निवड कठोर प्रशिक्षण आणि खडतर लढाऊ परिस्थितीत केली जाते. ही रेजिमेंट महायुद्धे आणि भारतातील सर्व मोठ्या युद्धांमध्ये सहभागी झाली आहे. १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान टायगर हिलचा ताबा मिळविण्यात या रेजिमेंटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कामगिरीने जागतिक पटलावर भारतीय लष्कराचे धाडस आणि ताकद प्रस्थापित केली.
'द ग्रेनेडिअर्स : इंडियन आर्मीज पिलर ऑफ पॉवर' येथे पहा
हा माहितीपट ग्रेनेडिअर्सचा गौरवशाली इतिहास तर दाखवतोच, शिवाय त्यांच्या धाडस, त्याग आणि शिस्तीची प्रेरणादायी कहाणीही सांगतो. लष्कर दिनाच्या या खास निमित्ताने नक्की पहा आणि भारतीय जवानांबद्दल आदर व्यक्त करा.