Photo Credit- X

India Women vs Ireland Women 3rd ODI 2025 Scorecard:  भारतीय महिला संघाने (IND) नाणेफेक जिंकली आहे. कर्णधार स्मृती मानधनाने पहिल्यांदा फलंजादी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात जशी भारतीय महिला संघाने मोठी धावसंख्या उभारली होती. तसेच चित्र या सामन्यातही पहायला मिळू शकते. भारताकडून प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांच्या जोडीने खेळ सुरू केला आहे. 6 षटकांत संघातने कोणतीही विकेट न गमावता अर्धशतक पूर्ण केले आहे. भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND W vs IRE W) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यासीठ समोरा समोर आहेत. येथे पहा सामन्याचे स्कोअर कार्ड

हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम खेळवला जात आहे. भारतीय महिला आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील तिसरा एकदिवसीय सामना भारतातील स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जीओ सिनेमा अॅप, वेबसाइटवर आणि दूरदर्शन नेटवर्क डीडी फ्री डिशवर उपलब्ध असणार आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने आयर्लंडला दिले 371 धावांचे लक्ष्य दिले होते. ते आयर्लंडला पूर्ण करता आले नव्हते.भारतीय कर्णधार स्मृती मानधनाने 54 चेंडूत 73 धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले होते. तिच्यानंतर, प्रतिका रावलनेही 67 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. हरलीन देओल शतक हुकली आणि 89 धावा करून बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्जने तिचा शानदार फॉर्म कायम ठेवत 91 चेंडूत 102 धावा केल्या हत्या. ज्यामुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली होती.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय महिला संघ: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, साईमा ठाकोर, मिन्नू मणी, तितस साधू, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, उमा छेत्री, राघवी. बिस्ट, सायली सातघरे.

आयर्लंड महिला संघ: सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), जोआना लॉफरन (यष्टीरक्षक), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, उना रेमंड-होई, आर्लीन केली, अवा कॅनिंग, फ्रेया सार्जंट, एमी मॅग्वायर, रेबेका स्टोकेल, जॉर्जिना डेम्पसी. , अलाना डालझेल, कुल्टर रेली.