Army Day 2025: भारतीय लष्कर दिन, ज्याला भारतीय सैन्य दिन देखील म्हणतात, दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय लष्करातील जवानांचा आणि त्यांच्या शौर्याचा सन्मान केला जातो. या दिवशी आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैन्याने केलेल्या बलिदानाचे स्मरण करतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याने केलेल्या बलिदानाचे स्मरण करत पोस्टच्या माध्यमातुन लष्कर दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, मोदी यांनी पोस्टमध्ये शुभेच्छा देत सांगितले कि, देशाच्या सुरक्षेचे पहारेकरी म्हणून उभ्या असलेल्या भारतीय लष्कराच्या अढळ धाडसाला आज लष्कर दिनानिमित्त आम्ही सलाम करतो. दररोज कोट्यवधी भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी देणाऱ्या शूरवीरांच्या बलिदानाचे ही आपण स्मरण करतो. हेही वाचा: Army Day 2025: लष्कर दिनानिमित्त एपिक यूट्यूब चॅनेलवर नक्की पाहा सेनेची शौर्य गाथा सांगणारा 'द ग्रेनेडिअर्स - अ पिलर ऑफ पॉवर ऑफ द इंडियन आर्मी' हा विशेष माहितीपट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर दिनाच्या दिल्या शुभेच्छा, पाहा पोस्ट
Today, on Army Day, we salute the unwavering courage of the Indian Army, which stands as the sentinel of our nation’s security. We also remember the sacrifices made by the bravehearts who ensure the safety of crores of Indians every day. @adgpi pic.twitter.com/LZa36V0QZf
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)