Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांच्यासह दोन फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऋषभ पंत आणि केएल राहुल यांचेही संघात पुनरागमन झाले आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.
𝐇𝐞𝐫𝐞 𝐚𝐫𝐞 𝐭𝐡𝐞 𝐩𝐥𝐚𝐲𝐢𝐧𝐠 𝐗𝐈𝐬 𝐨𝐟 𝐛𝐨𝐭𝐡 𝐬𝐢𝐝𝐞𝐬 🇮🇳🇧🇩#INDvBAN #Test #Chennai #RohitSharma #NajmulShanto #Sportskeeda pic.twitter.com/xYYyRKgpTD
— Sportskeeda (@Sportskeeda) September 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)