आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुन्हा लक्ष्य करत हिंमत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूकीला सामोरं यावं. कितीही यंत्रणा लावली, खोके वाटप केले तरीही शिवसैनिक विकला जाऊ शकत नाही असं म्हणत राजीनामा देऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचं आव्हान दिलं आहे. यावर 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाकडून प्रत्युत्तर देताना शीतल म्हात्रे यांनी 'आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अद्याप स्वतःचं जनसंपर्क कार्यालय देता आलेलं नाही. 2 आमदारांची त्यांना मदत घ्यावी लागते. काम होत नसल्याने या विभागातून एक नगरसेवक आमच्या गटात आला आहे. त्यामुळे तुमचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना उतरण्याची गरज नाही आमचे शिवसैनिकचं उत्तर देतील' असं ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Aditya Thackeray Challenge To Eknath Shinde: मी राजीनामा देतो, तुम्ही वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान .
पहा ट्वीट
वरळीमधून निवडणूकीत हरण्याची तुमची खुमखुमी आमच्यासारखे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिकच पूर्ण करतील... pic.twitter.com/TJ2bN6YE6J
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) February 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)