Aditya Thackeray on CM Eknath Shinde | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Aditya Thackeray Challenge To Eknath Shinde: गेल्या वर्षी झालेल्या सत्यानाट्यानंतर अद्यापही राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप थांबायचे नाव घेत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) दोन गटात विभाजन झाले. शिंदे गटाने (Shinde Group) भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटावर अनेक आरोप करण्यात आले. आता शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऑपन चॅलेंज दिलं आहे.

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना हे ऑपन चॅलेंज केलं. (हेही वाचा -Ajit Pawar On Shivsena: 'बंड होणार आहे, मी उद्धव ठाकरेंना आधीच इशारा दिला होता पण...'; शिवसेनेच्या फुटीवर अजित पवारांनी अगोदरचं केली होती भविष्यवाणी)

आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले, तुम्हाला जेवढे खोके वाटायचे तेवढे वाटा. पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवा, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

तथापी, पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री आहेत ना, म्हणून सध्या त्यांच्याकडे ताकद आहे. म्हणूनचं म्हणतोय वरळीत या. तसं ते वरळीत लपून छपून येत असतात. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवा, असं खुलं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.