मुंबई मेट्रो अक्वा लाइन 3 चा दुसरा टप्पा (फेज 2ए) लवकरच प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. बांद्रा कुर्ला संकुल (BKC) ते वरळीतील आचार्य आत्रे चौक दरम्यानचा चा 9.77 किलोमीटरचा हा मार्ग सुरु झाल्यानंतर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना जलद, वातानुकूलित प्रवासाची सुविधा प्राप्त होईल. फेज 2ए मध्ये 6 स्टेशन्स आहेत- धरावी, शीतळादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी, आणि आचार्य आत्रे चौक. या स्थानकांची कामे पूर्ण झाली असून, आता या ठिकाणी घोषणा, स्टेशन इंडिकेटर आणि ट्रेनच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. मुंबईकर या मार्गाला औपचारिक हिरवा झेंडा दाखवण्याच्या तारखेची वाट पाहत असून, लवकरच ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) द्वारे व्यवस्थापित, ही 33.5 किलोमीटरची पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाइन कफ परेड ते आरे कॉलनी दरम्यान आहे, आणि मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो आहे. पहिला टप्पा (आरे ते बीकेसी, 12.69 किमी) 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाला होता, आणि आता फेज 2ए च्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा: BEST Bus Fare Hike Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्ट बस भाडे वाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मान्यता)
Metro to Acharya Atre Chowk, Worli. Announcements, station indicators and train movement on Mumbai Metro Aqua Line 3 set for advanced route, awaiting date of formal flag off. pic.twitter.com/1mQMYrvXWo
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) April 30, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)