High Sea Waves Warning for Mumbai: मुंबईत आज रात्रीपर्यंत समुद्राच्या लाटा उसळणार (High Sea Waves) आहेत. यासंदर्भात BMC ने मुंबईकरांसाठी ॲडव्हायझरी जारी केली आहे. भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार, 4 मे सकाळी 11.30 वाजेपासून ते 5 मे रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची (Swell Surge Waves) शक्यता आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम जाणवू शकतो. सदर 36 तासाच्या कालावधीत पर्यटक, किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी तसेच इतर नागरिकांनी समुद्रात शिरू नये, चौपाटी भागात किनाऱ्यावर जाणे टाळावे असा सल्ला महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.

मच्छीमार बांधवांनी किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवाव्यात. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही, समुद्रात मासेमारी करताना कृपया योग्य ती दक्षता घ्यावी. समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहनही BMC कडून करण्यात आलं आहे. (वाचा -Maharashtra Weather: कोकणात उष्णतेची लाट, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)