विक्रोळी येथील 615 मीटरचा पूल बीएमसीकडून बांधून पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई येथील विक्रोळी परिसरात असलेला आणि लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विक्रोळी येथील 615 मीटरचा पूल बीएमसीकडून बांधून पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Vikhroli Bridge | (Photo Credit- X)

मुंबई येथील विक्रोळी परिसरात असलेला आणि लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) वर मुख्यमंत्र्यांनी लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय मी, तसेच माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आहे आणि तसे आदेश सुद्धा दिले आहेत. (हेही वाचा, Maharashtra Road Safety Upgrade: महाराष्ट्र रस्ता सुरक्षा सुधारणा; महामार्ग पोलीस टॅब, कॅमेरे आणि AI-Driven License चाचण्यांसह राहणार सुसज्ज)

मी मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये या कामाचे आदेश दिले होते. 104.77 कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आला. येणाऱ्या काळात पाऊस लक्षात घेता मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून हा पूल शनिवार, दि. 14 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजेपासून वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 09:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).