राज्यात कोरोनाचा नवीन विषाणु हळूहळू पसरत असताना आता धारावीत देखील ओमायक्रोनचा रुग्ण (Dharavi Omicron Case) सापडला आहे. पूर्व  आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोनची लागण झाली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नाहीत. आणि त्याने अजुन कोणतेही लसीकरण केलेले नाही आहे. या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवुन त्यांची तपासणी केली गेली आहे. कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)