महाराष्ट्रामध्ये काल (11 जून) मान्सूनचं आगमन झाल्यानंतर दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचं रूपांतर शक्तीशाली चक्रीवादळामध्ये झाला आहे. या परिस्थिती समुद्र खवळलेला बघायला मिळत आहे. मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबई मध्ये आज 12 जून दिवशी सकाळी 07:11, संध्याकाळी 7.12 वाजता भरती आहे. यावेळेस 3.52 ते 3.87 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर ओहोटीच्या वेळी 12:55 वाजता लाटेची उंची 1.82 मीटर असणार आहे. Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ रौद्र रूपात; समुद्रात उंच लाटा Watch Video .
पहा ट्वीट
१२ जून २०२३
मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून मेघर्गजनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून ४५-५५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील आणि शहर आणि उपनगरात उष्णता आणि दमट परिस्थिती राहिल.
भरती -
सकाळी ०७:११वा. - ०३.५२ मी.
सायंकाळी ०७:१२ वा -३.८७ मी .
ओहोटी -
रात्री…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)