कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईमधील मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले- 'कारशेड तयार होईपर्यंत मुंबई मेट्रो मार्ग 3 सुरू करता येणार नाही. कारशेडसाठी मागील सरकारने प्रस्तावित केलेली जमीन वादग्रस्त आहे. आमच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावित केलेल्या जमिनीवर 25% काम पूर्ण झाले आहे आणि उरलेले 75% काम ताबडतोब होईल. मुंबईकरांच्या फायद्यासाठी, मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावित केलेल्या जमिनीवरच कारशेड बनवले जावे.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)