गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र उन्हाच्या काहिलीने त्रासाला आहे. मुंब-पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट दिसून येत आहे. आता आज काही जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, धुळे, नाशिक, नांदेड, लातूर, सांगली, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. के एस होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. विजेच्या धोक्यांपासून सर्व सुरक्षा खबरदारी घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. (हेही वाचा: नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे सहा दिवसात 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान)

महाराष्ट्र हवामान अंदाज- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)