मुंबई, ठाणे, रायगड वगळता उर्वरित महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट आहे. येत्या 2 दिवसात गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचाही अंदाज IMD कडून वर्तवण्यात आला आहे. आज नागपूर,भंडारा,वर्धा, गोंदिया भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पावसामुळे नुकसान देखील झालं आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Alert: मुंबईचे तापमान वाढले, पारा आणखी चढण्याची शक्यता; उकाड्याने नागरिक कासावीस, राज्यात मात्र अवकाळीचे सावट .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)